माहिजी देवी यात्रेस सामाजिक कार्यकर्त्या सौ.अस्मिता पाटील यांची भेट

asmita-patil

पाचोरा (प्रतिनिधी अनिल आबा येवले) : येथून अवघ्या २५ किलोमीटर असलेल्या माहीजी या गावाची जत्रेची पूर्वीपासून परंपरा असून या माहि जी येथील देवीची यात्राही दरवर्षी सालाबाद प्रमाणे भरत असून मागील दोन वर्षापासून कोरोना काळामुळे बंद होती त्यामुळे त्या नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

 

ही यात्रा साधारणतः १५ दिवस असत. या यात्रेमध्ये देवीची आराधना केल्याने न होणारे काम होत असते असा समज असल्याने जळगाव जिल्ह्यातील भाविक तसेच अनेक राजकीय पुढारी व सामाजिक कार्यकर्ते दर्शनासाठी येत असतात.

 

यंदाच्या वर्षी या यात्रेच्या पूजेचे मानकरी माजी खासदार ए. टी. नाना पाटील व त्यांच्या पत्नी यांना मिळाला असून, त्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी या यात्रेस सामाजिक कार्यकर्ता सौ.अस्मिता पाटील यांनी देवी मातेचे दर्शन घेतले. तसेच गावातील महिलांसोबत नृत्यामध्ये सहभाग घेऊन देवीचा जागर साजरा केला. यावेळी त्यांच्यासोबत माहीजी या गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक व इतर महिला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here