पालघर (जिल्हा क्राइम रिपोर्टर रामदास दत्तू पाटील) : तालुक्यातील बहाडोली गावचे सुपुत्र प्रा.विवेक वसंत कुडू यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यावर्षीचा ‘काशीराम आत्माराम साठे कथा पुरस्कार’ मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
विशेष उल्लेखनीय बाब अशी की, प्रा.विवेक वसंत कुडू यांना पुरस्कार स्वरुपात मिळालेली रु. १०००० ही धनराशी त्यांनी प्रतिभा बालग्रंथालय बहाडोली करीता पुस्तके खरेदी साठी देणगी म्हणून दिल्याने, त्यांच्या या दानशूरवृत्तीबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.








