इराणमध्ये हिजाबप्रकरणी आणखी तिघांना फाशी

Three-more-hanged-in-Iran-over-hijab

तेहरान (इराण) : इराणमध्ये सुरू असलेल्या हिजाबविरोधी आंदोलनाची धग वाढतच असून, आता तेथे तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून आणखी तिघा आंदोलकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

 

हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार ठरल्याचा ठपका या तिघांवर इराणच्या सर्वोच्च न्यायालयाने ठेवला आहे. त्यामुळे इराणमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्यांची संख्या सतरावर पोहोचली आहे. त्यातील चौघांना फासावर चढवण्यात आले असून, अन्य आंदोलकांना दिल्या जाणाऱ्या शिक्षेची कार्यवाही बाकी आहे.

 

सरकारने कितीही अटकाव केला; तरी गेल्या तीन महिन्यांपासून इराणमध्ये सुरू असलेले हिजाबविरोधी आंदोलन दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here