मुंबई पोलिसांनी केली राखी सावंतची तब्बल सहा तास चौकशी

Mumbai-Police-interrogated-Rakhi-Sawant-for-six-hours

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : अंबोली पोलिसांनी अभिनेत्री राखी सावंतला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. राखी सावंतवर एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. यानंतर तक्रारदार मॉडेलच्या तक्रारीवरून अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

अभिनेत्री राखी सावंत, शर्लिन चोप्रा यांच्यात अनेक दिवासांपासून वाद सुरू आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी राखी सावंत, शर्लिन चोप्रा यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल एकमेकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. चोप्राच्या तक्रारीवरून राखी सावंत, अधिवक्ता फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.

 

ड्रामा क्विन राखी सावंतचा प्रियकर आदिल खान दुर्रानीसोबत विवाह झाला आहे. सोमवारी आदिल खानने लग्न अधिकृत असल्याचा खुलासा केला आहे. राखी सावंतने सार्वजनिक ठिकाणी हौशी फोटोग्राफर्स समोर रडण्याचा ड्रामा केल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यापार्श्वभूमीवर आदिलचा हा खुलासा समोर आला होता. यापूर्वी, राखीने एक इंस्टाग्राम रील व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये ती आदिलला हार घालताना दिसली होती. तिच्या प्रियकरासह तिचा एक व्हिडिओ पुन्हा शेअर केला होता. एक काझी समारंभाचे संचालन करत असल्याचे दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here