पारोळा बस स्टँड येथे अतिरेक्यांचा हल्ला

Militant-attack-at-Parola-bus-stand

पारोळा (जिल्हा क्राईम रिपोर्टर दिपक पाटील) : येथील बसस्टँडवर दोन आतंकवाद्यांनी बॉम्बस्फोट होऊन एक इसम जखमी झाला आहे असा पारोळा पो स्टेला फोन आला. त्यावेळी पोलिस स्टेशनला हजर असलेले पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे,API PSI गंभीर शिंदे,PSI राजू जाधव व ASI बापू पाटील,ASI जयवंत पाटील,हे कॉ महेंद्र मराठे,हे कॉ नाना पवार,हे कॉ सुधीर चौधरी,हे कॉ सत्यवान पवार,हे कॉ महेश पाटील,हे कॉ विनोद साळी,हे कॉ किशोर पाटील,पो ना संदीप सातपुते,पो ना नरेंद्र गजरे,पो ना प्रवीण पारधी,पो कॉ किशोर भोई,पो कॉ हेमचंद्र साबे,पो कॉ दीपक अहिरे,पो कॉ प्रशांत पगारे,पो कॉ मोहसीन खान,पो कॉ अरुण राठोड,पो कॉ शशिकांत निकम तात्काळ पोलीस स्टेशन येथून पारोळा बस स्टँड येथे रवाना झाले.

 

ठाणे अंमलदार यांनी सर्व सबंधित विभागास व वरिष्ठांना माहिती दिली तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकास,अंबुलन्स,फायर ब्रिग्रेड यांना पाचारण करून वरील स्टाफ पारोळा बस स्टँड येथे पोहचला व बाँब स्फोटात जखमी झाले एका इसमास पोलिसांनी टाकल अंबुलन्समध्ये नेले व दोन संशयितांना ताब्यात घेऊन पोलीस घेऊन गेले असता बस स्टँड वरील बरेच प्रवाशी नमूद ठिकाणी जमा झाले होते,व सर्वांचे मनात काय झाले संदर्भात संभ्रम निर्माण झाला असता प्रवाशी व हजर असलेले लोकांना समजले की पोलिसांनी बॉम्ब सदृश्य स्फोट झालेची रंगीत तालीम घेण्यात आली आहे.

 

पोलिसांना नमुद्ची माहिती मिळताच अवघ्या ३ तर ४ मिनिटात पोलीस बस स्टँडला पोहचले, तात्काळ जखमीस उपचारार्थ नेले व दोन संशयितास तात्काळ ताब्यात घेऊन गेले हे सर्व पाहत असतांना पारोळा पोलीस अतिशय सतर्क अवस्थेत असून जनतेची बरेच वेळ चर्च्या चालली व आम्ही सर्व जनता पोलिसांचे सतर्कतेमुळे सुरक्षित आहोत पोलिसांविषयी समाधान व्यक्त केले आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here