चोपडा येथे नियमबाह्य मोटरसायकल चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Punitive-action-against-illegal-motorcycle-riders

चोपडा (तालुका प्रतिनिधी रविंद्र कोळी) : रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागातील वैजापूर गावाजवळ १६ वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करून ६२०० रुपये वसूल करण्यात आला.

 

यावेळी वाहनचालकांना ट्रॅफिक नियमांबाबत सुचना देण्यात आल्या यात हेल्मेटचा वापर करणे, सीट बेल्ट वापरणे, वाहनावर असताना मोबाईल चा वापर न करणे, मद्यपान करून वाहन न चालविणे, ट्रिपल सीट बसू नये, कागदपत्रे जवळ बाळगणे,18 वर्षा खालील मुलांना वाहन न देणे, अश्या प्रकारच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

 

याप्रसंगी स .पो .शिंदे , पो. ह शिंगाने, पो .का रणवीर यांनी सहभाग घेवून पुढील कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here