कन्नड (क्राइम रिपोर्टर प्रदीप मोरे) : आज (दि.१८) गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानुसार मौजे वासडी व कन्नड येथे अवैध गौण खनिज भरारी पथक यांनी जनार्दन विधाते उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार संजय वारकड तहसीलदार कन्नड यांच्या भरारी पथकाने अवैध मुरूम वाहतूक करणारी तीन वाहने जप्त केली आहेत.
हायवा, एक ट्रॅक्टर व अवैध माती वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर असे एकूण ३ वाहने या कारवाईदरम्यान पकडून तहसील कार्यालय येथे लावण्यात आले आहेत पुढील दंडात्मक कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरील हायवा व ट्रॅक्टर चे वासडी येथे अवैध मुरूम वाहतूक करताना पथकांनी जप्त केले आहे. तसेच एक ट्रॅक्टर कन्नड येथे अवैध माती वाहतूक करत असताना पथकाने जप्त केले आहे. या मोहिमेमध्ये तलाठी बागुल मॅडम, तलाठी श्री घटे अप्पा ,तलाठी बहुरे आप्पा, कोतवाल शेख हरूण ,कोतवाल शहा रशीद इत्यादीचा सहभाग होता.







