पालघर (जिल्हा क्राइम रिपोर्टर रामदास दत्तू पाटील) : बुधवारी (दि.१८) रोजी पालघर तालुक्यातील ढेकाले येथे कोकण शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेचे प्रमुख श्री. रविंद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पालघर जिल्हा, कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे तडफदार,शिक्षक प्रिय उमेदवार श्री. ज्ञानेश्वर बारखू म्हात्रे सर, तसेच श्री.रवींद्र फाटक आमदार विधान परिषद, श्री संजय केळकर आमदार ठाणे , श्री. राजेंद्र गावीत पालघर लोकसभा खासदार, निरंजन डावखरे आमदार कोकण पदवीधर, श्री प्रकाश निकम जिल्हा परिषद पालघर, श्रीनिवास वनगा आमदार पालघर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या जाहीर सभेसाठी संपूर्ण पालघर जिल्ह्यातील शिक्षक मतदार, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.







