काकाने केला दोन पुतणीवर बलात्कार; मित्रालाही अत्याचार करण्यास सांगितले

rape-on-minor
file photo

पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : येथे काका पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आई-वडील आपल्या दोन मुलींना चुलत्याच्या घरी सोडून दिल्लीला गेल्यानंतर दोन्ही मुलींवर चुलत्याने व त्याच्या मित्राने पुतणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी समाजसेविका ही पीडित मुलींच्या ओळखीची असून, १४ आणि १० वर्षांच्या दोन मुलींना तिच्या आई-वडिलांनी आपल्या २९ वर्षांच्या चुलत्याजवळ सोडून दिल्ली येथे कामानिमित्त गेले होते. याचाच गैरफायदा घेत आरोपी चुलत्याने स्वतः लैंगिक अत्याचार केला. आणि त्याच्या मित्रालाही अत्याचार करण्यास सांगितले. हा प्रकार २० दिवसांपूर्वी घडला.

 

मुलींचे आई-वडील दिल्लीवरून अद्याप परतलेले नाहीत. त्यामुळे पुन्हा गैरकृत्याची शक्यता नाकारता येत नसल्याने मुलींनी फिर्यादी महिलेला चुलत्याच्या व त्याच्या मित्राच्या गैरकृत्याबद्दल सांगितले. त्यानंतर महिलेने खडक पोलीस ठाण्यात धाव घेत दोन्ही आरोपींविरोधात फिर्याद दिल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. हा प्रकार समजल्यानंतर फिर्यादी यांनी दिल्ली येथे गेलेल्या पीडित मुलींच्या आई-वडिलांना या गैरकृत्याबद्दल सांगितले. त्यानंतर त्यांनी तत्काळ दिल्ली सोडून पुणे गाठले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here