अबू आझमींच्या पीएच्या फोनवर आली जीवे मारण्याची धमकी

SP-MLA-Abu-Asim-Azmi-received-Death-Threat-On-PA's-Phone

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आसिम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अबू आझमी यांच्या पीएच्या नंबरवर एक फोन केला आणि अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्या व्यक्तीने अबू आझमी औरंगजेबाचं समर्थन करतात असं सांगत शिव्याही दिल्या तसंच जीवे मारण्याची धमकी दिली.

 

या प्रकरणी मुंबईतल्या कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. कुलाबा पोलिसांनी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात आयपीसी कलम ५०६ (२) आणि ५०४ लावून गुन्हा दाखल केला आहे. अबू आझमी यांना धमकी नेमकी कुणी दिली याचा शोध पोलीस घेत आहेत.

औरंगजेबाचा खरा इतिहास दाखवला तर हिंदू नाराज होणार नाहीत. औरंगाबादमध्ये अनेकांची नावं औरंगजेब असल्याचं विधान अबू आझमी यांनी केलं होतं. महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांमध्ये उस्मानाबाद, औरंगाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांची नावं मुस्लिम असल्याचंही अबू आझमी म्हणाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here