पत्नीचा आणि जिवलग मित्राचा एकमेकांवर जडला जीव; त्यात गेला पती जावेदचा जीव

solapur-crime

माळशिरस (तालुका प्रतिनिधी विनोद लोखंडे) : मैत्री हे परस्परांमध्‍ये घडणारे असे स्नेहपूर्ण नाते आहे जे सहकार्य, विश्‍वास, भावनिक आधार आणि बिनशर्त यावर आधारित असते. मात्र मित्रानेच मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेऊन मैत्रीच्या नात्याला काळीमा फासल्याची चीढ आणणारी घटना बावडा (ता. इंदापूर) येथे घडली.

 

प्रविण उर्फ बाबा तानाजी सावंत (रा. बावडा, ता. इंदापूर) असे मैत्रीला काळीमा फासणाऱ्याचे नाव असून, त्याचे काजल नामी आपल्या पत्नीचे असलेल्या अनैतिक संबंधातून जावेद जिलानी मुलाणी (रा. बावडा, ता. इंदापूर) या ३२ वर्षीय युवकाने शनिवारी (२१ जानेवारी) आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात मुस्तफा जिलानी मुलाणी (रा. बावडा, ता. इंदापूर) या जावेदच्या मोठ्या भावाने फिर्याद दिली असून, प्रविण सावंत आणि भावजयी काजल मुलाणी या दोघांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी इंदापूर पोलिसांनी प्रवीण सावंत व मयताची पत्नी या दोघांवरती आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल भारतीय कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

 

जावेद आणि आरोपी प्रविण सावंत हे दोघेही शाळकरी मित्र आहेत. २०१७ साली जावेदचे काजलशी लग्न झाले होते. मित्र असण्यासह पैशांच्या व्यवहारामुळे प्रविणचे जावेदच्या घरी नेहमी येणे जाणे होते. त्यातूनच प्रविण आणि काजल यांचे प्रेमसंबंध जुळले. परिणामी पत्नीशी भांडण आणि तणावामुळे जावेद व्यसनाच्या आहारी गेला. त्यातच प्रेमसंबंधाच्या आड येणाऱ्या जावेदला दोघा आरोपींकडून सतत मारहाण होत होती. आत्महत्यापूर्व संध्येलाही (२० जानेवारी) आपल्याच घरात दोघांना एकत्र पाहून जावेदने विचारणा केली असता प्रविणने त्याला शिवीगाळ व मारहाण केली.

 

शनिवारी (२१ जानेवारी) सकाळी १० वा. घरी येत आरोपीने मारहाणीची पुन्हा पुनरावृत्ती केली. परिणामी तणावात असलेल्या जावेदने आपल्या राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी चॅनलला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here