हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिर

balasaheb-thakare-malshirus

पिलीव (प्रतिनिधी विनोद लोखंडे ) : आज दिनांक 23 रोजी माळशिरस तालुका शिवसेना युवासेनेच्या वतीने पिलीव गावामध्ये महा रक्तदान शिबिर.डॉ.निलेश कांबळे यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

maharaktdan-shibirमान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी महाराष्ट्रात शिवसेना पक्षाची स्थापना केली. त्यावेळी महाराष्ट्रात निर्माण झालेली , मराठी द्वेषाची व मराठी माणसावर होणारा अत्याचार हा केवळ बोलून दूर होणार नाही, म्हणून त्यासाठी आणखी पर्यंत करायला हवे आहे हे बाळासाहेबांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी मग “शिवसेना” पक्षाची स्थापना केली.

 

“शिवसेना” हे नाव त्यांना त्यांच्या वडिलांनीच म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांनीच सुचविले होते. शिवसेना पक्षाच्या maharaktdanस्थापनेचा मागचा प्रमुख दृष्टीकोन होता तो ” हर हर महादेव” गर्जना प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अजून एकदा घुमायला हवी. प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राच्या इतिहासाचा स्वाभिमान आपल्या मनात बाळगायलाच हवा. म्हणून इ.स. १९ जून १९६६ ला महाराष्ट्रात शिवसेना पक्षाची स्थापना करण्यात आली. विचारधारेला मानणारा प्रत्येकजण म्हणूनच बाळासाहेब ठाकरे यांना मानतो. त्यांच्याप्रती आपली भावना व्यक्त करण्यासाठी व समाजाचं देणंही चुकविण्यासाठी यावेळी अनेकांनी रक्तदान करुन, हे शिबिर यशस्वी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here