दुकानावर कब्जा केला म्हणून लहान भावाविरुद्ध केली मोठ्या भावाने तक्रार

crime
stock photo

पुणे (शहर क्राइम रिपोर्टर रोहन सोनळे) : मोठ्या भावाने चालविण्यासाठी दिलेल्या दुकानावर लहान भावाने कब्जा करत बनावट कागदपत्रांच्या आधारे वीज कनेक्शन घेतले. महापालिकेत बनावट कागदपत्रे सादर करून स्वतःच्या नवे नळ कनेक्शन घेतले. याप्रकरणी लहान भावावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सन २०१८ ते सन २०१९ या कालावधीत गावडे कॉलनी, चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी मारुती आबा सुपेकर (वय ७०, रा. गावडे कॉलनी, चिंचवड) यांनी रविवारी (दि. २२) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल आबा सुपेकर (वय ६५ रा. गावडे कॉलनी, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मारुती यांच्या जागेत त्यांनी लहान दुकान सुरु करून ते त्यांचा लहान भाऊ अनिल यांना चालविण्यासाठी दिले. दरम्यान अनिल यांनी महापालिकेच्या कर संकलन विभागात खोटे कागदपत्र व प्रतिज्ञापत्र सादर करून त्या दुकानात स्वतःच्या नावे नळ कनेक्शन घेतले. तसेच बनावट कागदपत्रे व प्रतिज्ञापत्र सादर करून वीज कनेक्शनही घेतले. याप्रकरणी त्यांनी मारुती यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here