हातात कोयते घेऊन दहशत माजविणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

The-two-men-who-were-terrorizing-with-knives

पुणे (शहर क्राइम रिपोर्टर रोहन सोनळे) : बेकायदेशीररित्या कोयते हातात घेऊन त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत पसरवणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकाश दयानंद गायकवाड (वय १९, रा.सुसगाव,मुळ सोलापूर) व विजय भगवान आडे (रा.सुसगाव, मुळ परभणी) या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कादेशीररित्या बंदी असताना देखील आरोपींनी हातात कोयते घेऊन फोटो काढले व ते सोशल मिडीयावर टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.नागरिकांनी ही याबदद्ल पोलिसांकडे तक्रार केली होती. आरोपींकडे कोणताही शस्त्र परवाना नसताना त्यांनी हातात कोयता घेऊन फोटो काढले व ते प्रसारीत केले. यावरून पोलिसांनी आरोपीना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लोखंडी कोयते देखील जप्त केले आहेत.

 

ही कारवाई हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल दहिफळे, सोन्याबापु देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदे विरोधी पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ, सहायक पोलीस फौजदार महेश वायबसे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष डामसे, सोमवंशी पोलीस अंमलदार रवी पवार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here