पठाण’ सिनेमाची रेकॉर्डब्रेक कमाई; मध्यरात्रीचा शोदेखील हाऊसफुल

pathan-movie

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : बॉलिवूडचा किंगखान शाहरुखचा बहुचर्चित सिनेमा ‘पठाण’ सिनेमागृहात आला. तब्बल ४ वर्षानंतर शाहरुख खानने रुपेरी पडद्यावर एंट्री केलीय. त्यामुळे चाहते वेडे झाले आहेत. पठाण केवळ यशस्वीच नाही तर त्याला बॉलिवूडसाठी ऑक्सिजन असल्याचं म्हटलं जात आहे.

 

चित्रपट पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते. चित्रपटगृहांबाहेर लोकांची गर्दी दिसून येत आहे. चित्रपटगृहांमध्ये मध्यरात्री १२:३० सिनेमाचे शो सुरू होताना अनेक वर्षांनी गर्दी पाहायला मिळाली आहे. चाहत्यांमध्ये किंग खानचा चित्रपट पाहण्याचा उत्साह पाहून वायआरएफच्या निर्मात्यांनी रात्री उशिरा शो सुरू केले आहेत. यासोबतच दुसऱ्या दिवशी सकाळी शो देखील वाढवण्यात आले आहेत.

 

२६ जानेवारीची सुट्टी पठाणसाठी फायदेशीर ठरणार आहे. आतापर्यंत हा चित्रपट जगभरात आठ हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. दिवस रात्रीचे बहुतेक शो हाऊसफुल्ल झाले आहेत. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत ‘पठाण’ने सुमारे २० कोटींची कमाई केल्याचे बोलले जात आहे.

 

किंग खाननं सकाळी एन्ट्री केली तर भाईजान सलमाननं संध्याकाळी जलवा दाखवला. शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज झाला. आणि त्याच दिवशी संध्याकाळी सलमान खान चाहत्यांना सरप्राईज घेऊन आला. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. यातील त्याच्या लांब केसांच्या स्वॅगने सगळ्यांनाच त्याचे वेड लावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here