देशभरातून ९०१ पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर

police-rashtrpati-padak

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील ९०१ पोलिसांना बुधवारी राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. पोलिस दलात केलेले शौर्य, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील ७४ पोलिसांना गौरविण्यात येणार आहे. राज्यातील पदक विजेत्यांमध्ये मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त महासंचालक अनुपकुमार सिंह, गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम, सहआयुक्त (अभियान) जयकुमार, आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त निशित मिश्रा यांचा समावेश आहे.

 

देशभरातील ९०१ पोलिसांना राष्ट्रपती पदके देण्यात येणार असून यामध्ये महाराष्ट्रातील ७४ पोलिसांचा समावेश आहे. देशातील ९३ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना उल्लेखनीय सेवेकरिता राष्ट्रपती पदके जाहीर झाली असून यामध्ये यात महाराष्ट्रातील चार पोलिसांचा समावेश आहे. विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलिस महासंचालक अनुपकुमार सिंह, उपनिरीक्षक संभाजी देशमुख, दीपक जाधव अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. महाराष्ट्रातील ३१ पोलिसांना विविध विभागांत बजावलेल्या शौर्याबद्दल पदके देण्यात येणार आहेत.

 

पोलिस दलामध्ये गुणवत्तापूर्वक सेवा बजावल्याप्रकरणी राज्यातील ३९ पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदके जाहीर करण्यात आली आहेत. मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम, सहआयुक्त जय कुमार, आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त निशित मिश्रा, अधीक्षक संतोष गायके, सहायक आयुक्त चंद्रकांत मकर, निरीक्षक दीपक चव्हाण, रमेश कठार, देविदास घेवरे, सुधाकर काटे, शैलेश पासलवाड, मनोज नेर्लेकर, शाम शिंदे, अलका देशमुख, दत्तात्रय पाबळे, बापू ओवे, प्रसाद पांढरे, शिरीष पवार, सदाशिव पाटील, सुरेश गाठेकर, दिलीप सावंत, संतोष कोयंडे, चंद्रकांत लांबट, झाकीरहुसेन किल्लेदार, भरत पाटील, प्रमोद कित्ये, आनंद घेवडे, सुकदेव मुरकुटे, गोकुळ वाघ, धनंजय बारभाई, सुनील गोपाळ, दत्तात्रय काढणोर, ज्ञानेश्वर आवारी, रामकृष्ण पवार, ओमप्रकाश कोकाटे, सुभाष गोईलकर, संजय कुपेकर, प्रदीप अहिरे, प्रकाश घाडगे, विजय पवार या पोलिसांचा पदक मानकऱ्यांमध्ये समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here