बॉयफ्रेंड नाही तर कॉलेजमध्ये प्रवेश नाही; ओडिसातील महाविद्यालयाचा अजब कारभार

College-Entry-Banned-Without-Boyfriend

नवरंगपुर (ओडिसा) : सिंगल विद्यार्थिनीला बॉयफ्रेंडशिवाय कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही, अशी नोटीस व्हायरल झाली आहे. उमरकोट पेंद्रणी महाविद्यालयात अशी नोटीस बजावण्यात आल्याची अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नोटीसवर कॉलेजच्या प्राचार्यांचीही स्वाक्षरी आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या नावाने व्हायरल झालेल्या या नोटीसबाबत या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ही नोटीस खोटी असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले.

 

या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे की, ‘१४ फेब्रुवारीपर्यंत सर्व मुलींना किमान एक बॉयफ्रेंड असणे बंधनकारक आहे. हे सुरक्षेच्या उद्देशाने करण्यात आले आहे. बॉयफ्रेंड नसलेल्या मुलींना महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. त्यांना त्यांच्या प्रियकरासह अलीकडील चित्र दाखवावे लागेल. प्रेम पसरवा. विद्यार्थी आपल्या प्रियकरासोबत फोटो काढतील आणि ओळखपत्राप्रमाणे कॉलेजच्या प्रवेशद्वारावर दाखवतील, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नोटीसवर महाविद्यालयाच्या प्राचार्यांची स्वाक्षरी आहे. ती बनावट असल्याचे सांगितले जात आहे.

 

याबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्या अनिता माळी यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या, नोटीस पूर्णपणे बनावट आहे. व्हायरल होत असलेला नोटिफिकेशन क्रमांक गेल्या २६ जानेवारीला सरस्वती पूजेसाठी जारी करण्यात आला होता. कोणीतरी त्याची कॉपी करून ती व्हायरल केली. पोलिसांनी याबाबत माहिती दिली जाईल. अशी नोटीस व्हायरल करणारा आरोपी कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. विद्यार्थ्याची मानहानी झाली आहे, अशी आक्षेपार्ह नोटीस मोबाईलवरून मोबाईलवर फिरवली जात आहे, मात्र कॉलेज प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here