दोथिगुडम येथील ‘हॅझेलो लॅब प्रायव्हेट लिमिटेड’ या औषध निर्मिती कंपनीत रिॲक्टरचा स्फोट

हॅझेलो लॅब

यादाद्री भोंगिर (वृत्तसंस्था) : शुक्रवारी रात्री उशिरा यादाद्री भोंगिर जिल्ह्यातील पोचमपल्ली मंडळातील दोथिगुडम येथील ‘हॅझेलो लॅब प्रायव्हेट लिमिटेड’ या औषध निर्मिती कंपनीत रिॲक्टरचा स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत.

या स्फोटामुळे कंपनीच्या आवारात आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.जखमी झालेल्या दोन कामगारांना उपचारासाठी हैदराबादला हलवण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मृत कामगारांची ओळख राजशेखर (वय ३८) आणि नागराजू अशी पटली आहे. राजशेखर हे सूर्यपेट जिल्ह्यातील माधवपुरम गावचे रहिवासी होते. रिॲक्टरच्या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्रशासनाने या घटनेचा तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here