जळगाव (मुख्य संपादक सुनिल पाटील) : शिवसेना भगवा गार्ड चे सदस्य ज्येष्ठ शिवसैनिक विष्णु गवळी यांना आयलंड प्रोटेक्शन फौरम च्या वतीने अंदमान येथे द्वीप सेवा पुरस्कार प्रदान. दि.२८ ज्येष्ठ शिवसैनिक विष्णु गवळी यांना आज अंदमान येथे २५ वर्षे सामाजिक कार्यात योगदान देत अविरत सेवा कार्य करत असल्याने एका सर्वस्पर्शी सावरकर भक्त सामाजिक कार्यकर्ता शिवसैनिकांचा द्वीप समूह पुरस्काराने सन्मान झाल्याने सर्वत्र अभिनंदन कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मागील ३५वर्षा पासुन गवळी हे अंदमानात सतत सावरकर विचार पसरवण्याचे व राष्ट्र भक्तीचे बिज रोपण करण्याचे काम निष्काम कर्मयोगी बनून करत असल्याचाच अनुभव द्वीप वासियांना असल्याचे आम्हाला गवळी यांचा अभिमान आहे असे द्वीप प्रोटेक्शन फोरम चे अध्यक्ष एम् . टी.मुस्तफा यांनी म्हटले आहे. सदर कार्यक्रमात अंदमानातील भूमी पुत्रांना नोकरीत प्राथमिकता मिळावी 90./. स्थानिक भूमी पुत्र व 10./. इतर अधिकार ही आयलंड प्रोटेक्शन फोरम ची मागणी योग्य आहे त्यास शिवसैनिक म्हणुन आमचे समर्थ आहे असे गवळी यांनी सांगुन याकरिता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव जी ठाकरे, खासदार संजय राऊत,
अरविंद सावंत, अनिल देसाई व सर्व खासदारांची राजकीय पक्षांच्या नेत्यांची या मागणी संदर्भात समर्थन मिळावे यासाठी त्यांना भेटून विनंती करण्यात येईल असे आश्वासन गवळी यांनी दिले आहे. तसेच स्थानिक भूमी पुत्राच्या मागणीचा अंदमान निकोबार द्वीपसमूह प्रशासनाने विचार करून निर्णय तातडीने न घेतल्यास राज निवास व त्यांच्या सचिवालया समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमास बिहार चे मुखयमंत्री नितिश कुमार यांचे विश्वासू सहकारी आमदार आफाक अहमद खान, पंडित राजकुमार द्विवेदी, मधु कुमार, श्याम चौरसिया, सत्येंद्र कुमार, मुंशीलाल, ए. टी. मुस्तफा, रफीक भाई, सुरेश गोठी व हजारो अंदमान निकोबार द्वीपसमुहा वरील तरुण व नागरिक उपस्थित होते, गवळी यांनी आपल्या भाषणात बेरोजगार युवकांना भूमिपुत्रांना समर्थन दिल्याने बेरोजगारांचे प्रश्न उफाळून आला आहे







