आंतरराष्ट्रीय मानव अधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटनेची बैठक संपन्न

Meeting-of-Women's-Crime-Control-Association-concluded

जळगाव (मुख्य संपादक सुनिल पाटील) : प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटना नवी दिल्ली ( भारत सरकार रजिस्टर ) जळगाव जिल्हा संघटनेची त्रयमासिक सभा आज (दि.२८) शनिवार रोजी संघटनेचे जिल्हा जनसंपर्क अधिकारी विजय शिंदे यांचे निवासस्थानी संपन्न झाली .

 

सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष चंद्रशेखर कापडे तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत दुसाने व महिलाविभागीय अध्यक्षा सौ.भारतीताई कुमावत, जिल्हा अधीक्षक प्रवीण पाटील हे लाभले . सभेत शिंपी समाज चिंतामणी पुरस्कार मिळाल्या बद्दल जेष्ठ समाजसेवक मुकुंदजी मेटकर यांचा आणि डॉ.उल्हास पाटील लॉ कॉलेज येथे प्र.प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्षा सौ.नयनाताई झोपे यांचा संघटनेच्यावतीने मान्यवर व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला .

 

International-Human-Rightsसभेत जिल्हा अध्यक्ष कापडे यांनी मागील आढावा घेतला. आज नवनियुक्त पदाधिकारी यांना प्रमुख पाहुण्यांचे हस्ते कार्ड वाटप व सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले त्यात प्रवीण जगताप :जळगाव जिल्हा उपाध्यक्ष, इम्रान शहा: जिल्हा निरीक्षक, निलेश सोनवणे तालुका अध्यक्ष, रवी व्यास तालुका उपाध्यक्ष, निखिल मेटकर जिल्हा संघटक याप्रमाणे नियुक्त देऊन प्रमाणपत्र कार्ड वाटप करण्यात आले.

 

प्रदेशाध्यक्ष शशिकांत दुसाने, विभागीय महिला अध्यक्ष सौ भारतीताई कुमावत, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखरभाऊ कापडे, मुकुंदभाऊ मेटकर यांचे सभेला मार्गदर्शन लाभले सूत्रसंचालन जिल्हा जनसंपर्क अधिकारी विजय शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन इमरान भाई शहा यांनी केले. खेळीमेळीच्या वातावरणात आजची सभा संपन्न झाली, सभा सुरू असताना राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते ह्यांनी भ्रमणध्वनी वरून सभेला मार्गदर्शन केले व पदाधिकारी यांचा उत्साह वाढविला सुरुची भोजनानंतर सभेचा समारोप झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here