माळशिरस (तालुका प्रतिनिधी विनोद लोखंडे) : माघ शुद्ध एकादशी एक फेब्रुवारीला आहे. या माघी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविक मोठ्या प्रमाणात येतात. वारीत येणाऱ्या भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षितपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी १ हजार ५५० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये ०२ पोलीस उपअधिक्षक, २१ पोलीस निरिक्षिक, ६९ सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, ७१३ पोलीस कर्मचारी व ७०० होमगार्ड तसेच ०१ एसआरपीएफ कंपनीच्या तुकडी तर एक शीघ्र कृती दल पथक नियुक्त करण्यात आले आहेत.

यात्राकाळात होणारे अपघात कमी करण्यासाठी सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर विभागातील पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे. पंढरपूरकडील महामार्गावर विशेष गस्त व पेट्रोलिंग केले जाणार आहे. विशेषता पंढरपूर -कोल्हापूर या महामार्गावर ठिकाणी पोलिस केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.







