चोपडा (प्रतिनिधी रविंद्र कोळी) : आझाद चौक परिसरात दुचाकीचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरुन एकाला धारदार शस्त्राने भोसकल्याची घटना घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, जगदीश शिवाजी पाटील, वय २३ वर्ष राहणार आशा टाकीज जवळ, चोपडा व शेख फजले शेख नईम वय २० वर्ष राहणार दर्गाह अली या दोघांमध्ये आझाद चौक येथे किरकोळ कारणावरून वाद झाला. या नंतर शेख फजले याने जगदीश पाटील यांच्या कमरेच्या वरती धारदार शस्त्राने वार करून जखमी केले.
या घटनेमुळे आझाद चौक परिसरात एकच खडबड उडाली. घटनास्थळी तत्काल शहरी पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि. अजित सावळे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन परिसराची पाहणी केली व जखमिवर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी गुरुप्रसाद वाघ यांनी उपचार सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणातील गुन्हेगारास तात्काल ताब्यात घेत अटक केली आहे.







