बेशिस्त ऊस वाहतूक ट्रॅक्टर ड्रायव्हरवर कारवाई करण्याबाबत युवासेनेचे निवेदन

yuvasena-piliv

माळशिरस (तालुका प्रतिनिधी विनोद लोखंडे) : माळशिरस तालुका युवासेनाकडून पिलीव पोलीस स्टेशनला बेशिस्त ऊस वाहतूक ट्रॅक्टर ड्रायव्हर कारवाई करावी या बद्दल निवेदन देण्यात आले. २ फेब्रुवारी रोजी झालेल्या श्रद्धा पाटील हिच्या अपघाती मृत्यूच्या अनुषंगाने बेशिस्त ऊस वाहतूक ट्रॅक्टर ड्रायव्हर वर कारवाई करावी यासाठी हे निवेदन देण्यात आले.

युवासेना माळशिरस तालुका प्रमुख मा. सुभाष काकडे यांच्या नेतृत्वात पिलीव पोलीस स्टेशन येथे ऊस वाहतूक ट्रॅक्टर ड्रायव्हर बेशिस्त पणे वाहन चालवत् असल्यामुळे जीवित हानी होत आहे त्याबद्दल पोलीस प्रशासनाने यात लक्ष घालून त्वरित योग्य ती कारवाई करावी या बद्दल निवेदन देण्यात आले.

 

yuvasena-nivedan
निवेदनात ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर मध्ये कर्ण कर्कश्श आवाजात गाणी लावली जातात त्याच्यावर नियंत्रण ठेऊन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चालका वर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती केली. यावेळी निवेदन देताना युवासेना माळशिरस तालुका उप प्रमुख डॉ. निलेश कांबळे, शिवसैनिक योगेश देशमुख, प्रा. शंकर शिंदे सर, पत्रकार संजय पाटील सर महेश देशमुख, प्रभाकर माने, मंगेश लोखंडे, संतोष झेंडे, सर्व पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here