पद्मभूषण पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे निधन

wani-jayram

नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : पद्मभूषण पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे निधन झाले आहे. त्या ७७ वर्षांच्या होत्या. वाणी जयराम राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्गज पार्श्वगायिका वाणी जयराम यांचे निधन झाले. संगीतविश्वाला धक्का देणारी ही बातमी अवघ्या काही तासांपूर्वीच समोर आली आहे. वाणी जयराम यांना यावर्षी अलीकडेच ‘पद्मभूषण’ या भारतातील तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चेन्नईतील नुंगमबक्कम येथील हॅडोस रोडवरील त्यांच्या घरी या प्रसिद्ध गायिकेने अखेरचाा श्वास घेतला.

 

वाणी जयराम यांचे निधन नक्की कशामुळे झाले याबाबतअद्यप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. वाणी जयराम यांना याच वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वाणी यांच्या अकस्मित निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून, यामुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

 

यंदाच्या वर्षीच त्यांना ‘पद्मभूषण’ हा मानाचा पुरस्कार देण्यात आला होता. वाणी जयराम यांनी अलीकडेच पार्श्वगायिका म्हणून करिअरची ५० वर्षे पूर्ण केली. १८ भारतीय भाषांमध्ये त्यांनी १०००० हून अधिक गाणी स्वरबद्ध केली होती. त्यांना ३ वेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

 

वाणी जयराम यांनी हिंदीसह तमिळ, कन्नड आणि अन्य भाषांमध्ये पार्श्वगायन केले. १९७१ मध्ये वाणी जयराम यांना पहिल्यांदा हिंदी चित्रपटात गायनाची संधी मिळाली होती. ‘गुड्डी’ या चित्रपटाला त्यांनी आपला आवाज दिला होता. या चित्रपटातील ‘बोल रे पपीहा’ हे गाणे त्यांच्याच आवाजात स्वरबद्ध करण्यात आले होते. यानंतर त्यांनी ‘एक मुठ्ठी आसमां’, ‘खून का बदला खून’ आणि ‘सोलवा सावन’सह अनेक हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here