बार्शीटाकळी (तालुका क्राइम रिपोर्टर संजय सर) : नवीन वर्षाची सुरुवात बार्शीटाकळी तालुक्यातील मंदिरातील दानपेट्या फोडून,त्यातील दानराशी लंपास करण्यापासून सुरु झाले होते. लागोपाठच्या दानपेट्या फोडण्याच्या घटनेने पोलीस विभागाला चोरट्यांने आव्हानच दिले होते.
सदरची बाब जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी गंभीरपणे घेतल्यामुळे आणि योग्य मार्गदर्शन केल्यामुळे बार्शीटाकळी व पिंजर पोलीस स्टेशनचे कर्मचारी कामाला लागले होते. म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर.. आणि त्याची प्रचिती यायला जास्त अवधी लागला नाही.
पिंजर पोलीसांचे विशेष पथक आरोपीचा शोध घेत असतांना दि. ३ फेब्रुवारी २३ रोजी, महान चौकीचे पोलीस हवालदार दत्तात्रय चव्हाण यांना, वाघा गड मंदीर संस्थान यांचे कडुन माहिती प्राप्त झाली की, एक संशयीत इसम हा मंदीरातील दानपेट्या फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे यांनी लागलीच पोलीस उपनिरीक्षक बंडु मेश्राम, पो.हवा. दत्तात्रय चव्हाण, पो.हवा राजेंद्र वानखडे, पो.हवा नागेश दंदी, पो.शि. वैभव मोरे यांचे पथक पाठवुन सदर आरोपीस ताब्यात घेतले. त्याचे कडे स.पो.निरी. वाढवे, पो.उपनिरी. गोपाल जाधव यांचे पथकाने कौशल्यपूर्वक विचारपुस केली असता, आरोपी नामे दत्ता सुदाम झाटे वय ३३ वर्षे, रा. धमधमी ता. मालेगांव जि. वाशिम यांने पो.स्टे. पिंजर हद्दीतील वाघागड येथे मंदीर चोरी करण्याचे उद्देशाने दानपेटी सोबत छेडखानी केली होती. तसेच ग्राम खेर्डा भागाई येथील गजानन मंदीरातील दानपेटी, पो.स्टे.बार्शिटाकळी हद्दीतील खोलेश्वर मंदीर बार्शिटाकळी.. करूणेश्वर महादेव संस्थान बिहाडमाथा महान, गजानन महाराज मंदीर महागाव येथील दानपेट्या फोडुन ,त्यातुन रक्कम चोरी केल्याचे तसेच धाबा येथील स्टेट बँक ऑफ इंडीया येथील एटीएम मशीन व धाबा येथील अकोला मध्यवर्ती बँकेचे कुलुप तोडुन तेथे चोरी करण्याचा प्रयत्न केला होता असे मान्य केले.
तसेच सदर आरोपी याने पो.स्टे. जवळका ता. मालेगाव जि. वाशिम येथून दोन मोटार पंप चोरी केल्याचे व पो.स्टे.मंगरूळपिर हद्दीमध्ये दोन ठिकाणी मंदीरातील दानपेटी फोडुन चोरी केल्याचे मान्य केले आहे. सदर आरोपी यांने आज पावेतो केलेल्या तपासामध्ये एकुण ११ ठिकाणी चोरी केल्याचे कबुल केले आहे व त्याचे कडुन रोख रक्कम १०,८००/- रू. तसेच चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे ग्राईंडर मशिन, पेंचिस व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे.
सदरचा गुन्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती मोनिका राऊत व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगांवकर यांचे मार्गदर्शनात पो.नि. संतोष महल्ले यांचे नेतृत्वात पो.स्टे. बार्शिटाकळीचे ठाणेदार संजय सोळंके, पो.स्टे. पिंजरचे ठाणेदार अजयकुमार वाढवे, पो.उपनि. बंडु मेश्राम, स.पो.उपनिरी रमेश खंडारे, पो.हवा दत्तात्रय चव्हाण, राजेंद्र वानखडे, पो.शि वैभव मोरे, श्रीकांत आजलसांडे, गोपाल अकोटकर, चालक नागेश दंदी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उपनि गोपाल जाधव, स.पो.उपनि. दशरथ बोरकर, पो.नाईक गोकुळ चव्हाण, पो.शि लिलाधर खंडारे, शेख अन्सार, चालक विजय कबले यांचे पथकाने उघडकीस आणला आहे.







