नेतृत्वाखाली वेळापूर पोलिसांनी केले शहरात पथसंचलन

velapur-police

वेळापूर (सोलापूर जिल्हा प्रतिनिधी विनोद लोखंडे) । पोलिसांनी वेळापूर अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ . बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांच्या नेतृत्वाखाली वेळापूर पोलिसांनी शहरात पथसंचलन करण्यात आले .

 

परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी , शांतता रहावी तसेच वेळापूर कडे पुरोगामी विचारांचे वेळापूर तसेच राजकीय क्षेत्रात देखील वेळापूरचा प्रथम विचार केला जातो आणि वेळापूर परिसरामध्ये विविध धर्माचे व जातीचे लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत , हिच परिस्थिती वेळापूर परिसरात कायम राहावी त्याचबरोबर कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावतील आशा पोस्ट फोटो सोशल मिडीयाच्या फेसबुक , व्हॉट्सप इंस्टाग्राम व ट्विटर वरून पोस्ट करु नयेत, असे आवाहन केले आहे.

 

अशा प्रकारच्या पोस्ट कृत्यांवर पोलिसांची करडी नजर असून अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहेत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सामाजिक सलोखा कायम अबाधित कसा राहील राखता येईल यावर यासाठी सर्वांना सहकार्य करावे सायबर सेलचे विशेष पथक सध्या सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे कुठल्याही सामाजिक जातीवादी कृत्य सहभागी होऊ नका अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे आव्हान पथसंचालन करतेवेळी करण्यात आले.

 

यावेळी पथसंचलन वेळापुर पोलिस स्टेशन पालखीचौक , वेळापुर बसस्थानक , बाजारपटांगण क्रान्तीचौक , तलाठी कार्यालय वेळापुर ग्रामपंचायत येथुन येऊन वेळापुर पोलिस स्टेशन येते सांगता करण्यात आली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here