पिलीव (सोलापूर जिल्हा क्राईम रिपोर्टर विनोद लोखंडे) । माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साठेनगर या शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे गुलाब पुष्प पुस्तके देऊन अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती साठे नगर तानाजी शिवाजी लोखंडे.यांनी स्वागत केले यावेळी सर्व शिक्षक नेते मंडळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तानाजी लोखंडे म्हणाले जिल्हा परिषद शाळेत पहिल्याच दिवशी मुलांचे मुलींचे स्वागत करायला संधी मिळाली समाधान वाटले तालुक्यातील सर्वच शाळेचा दर्जा आणि शिक्षण अतिशय चांगले आहे.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, त्यांनी स्वत: जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेतले. याच शाळेने आपल्याला सत्यासाठी लढण्याची शिकवण दिली. शिक्षणाने आपण चांगले व्यक्ती बनतो. शिक्षण आपल्या चालण्यातून, वागण्यातून,बोलण्यातून दिसायला हवा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणासोबतच संस्कार होतात, ही अभिमानाची बाब असून सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्रासाठी शुभेच्छा देतो असे श्री.तानाजी लोखंडे यांनी शेवटी सांगितले.यावेळी शिवाजी तुकाराम लोखंडे,विजय लोखंडे सर्व ग्रामस्थ शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.







