जळगाव (संपादक सुनिल पाटील) । आज जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजीनगर मधील खुबचंद सागरमल शाळेमधील गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांसमवेत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सन्माननीय राहुल जी गांधी यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
सन्माननीय राहुलजी गांधी हे तळागाळातील गोरगरीब जनतेसोबत नाळ जुळलेले नेते आहेत. सन्माननीय राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून या भारत देशातील जनतेसोबत संवाद साधून एकता, समता व बंधुता याचा संदेश दिला. त्यामुळे नक्कीच पुढील वर्षाचा राहुल जी गांधी यांचा वाढदिवस हा पंतप्रधान राहुल गांधी म्हणून साजरा करण्यात येईल, यात कुठेही शंका नाही असे मत जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, मा. युवक काँग्रेस प्रदेश सचिव बाबा देशमुख, सुरेंद्र कोल्हे, नईम खान, गोकुळ चव्हाण, जाकीर शेख, प्रवीण पाटील आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







