एक वर्षापासून फरार आरोपी कोल्हापूर पोलिसांनी केला जेरबंद

kolhapur-police

कोल्हापूर (सतीश चव्हाण) । दिनांक २०/०६/२०२३ खुनासह मोका अतंर्गत कारवाईतील तसेच वि.प.रोड, पोलीस ठाणे मुंबई येथे दाखल दरोडयाच्या गुन्हयामध्ये गेल्या एक वर्षा पासुन फरारी असलेला इम्तीयाज पठाण रा. हडपसर पुणे याला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पथकाने जेरबंद केले.

 

 

विठठल भाई पटेल रोड मार्ग पोलीस ठाणे मुंबई येथे दाखल असलेला गु.र.न. २९७/२०२२भा. द.वी. कलम ३९४,३९५, ३९७, ३४१, ५०४, ५०६ (२), १२० (व) या गुन्हयातील फिर्यादी श्री कस्तुर रंगाजी घांची, रा. नेमाणे रोड, दुसरा भोईवाडा मुंबई हा सोने जडजवाहीरांचा हवाला व्यवसाय करणारा असुन, त्याला दिनांक २७/०५/२०२२ रोजी ०७.३० वा. सुमारास बिल्डींग न.५६ समोर दुसरा भोईवाडा, भुलेश्वर मंदीर जवळ रोडवर जात असताना, त्यास आरोपी इम्तीयाज खाजाखान पठाण यांचेसह त्याचे अन्य साथीदार यांनी त्यास गाठुन, त्याला शस्त्राचा धाक दाखवुन, त्याचे डोळ्यात मिरची पावडर मारून, त्यांचे कडील सोन्याचे व हि-याची असलेली हवालाची बॅग, हिसकावुन घेवुन ७१,४५, ७९०/- रुपयाचे माल जबरदस्तीने काढुन घेवुन पळुन गेले होते. तेव्हा पासुन सदर गुन्हयातील मुख्य आरोपी इम्तीयाज खाजाखान पठाण वय ३२ रा. हडपसर पुणे हा मागील एक वर्षा पासुन फारारी होता. त्यांचे विरुध्द हडपसर, वानवडी, बंडगार्डन, लोणी काळभोर पोलीस ठाणेस पुणे जिल्हयात खुनासह मोका अंतर्गत दोन गुन्हे, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी व दरोडा असे गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तो मोक्याच्या गुन्हयातुन जामीनावर खुला होताच त्याने सदरचा गुन्हा करुन तो फरारी झालेला होता.

 

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडील पो.ना. सागर चौगले यांना आरोपी वर नमुद गुन्हयात फरारी असलेला आरोपी इम्तीयाज खाजाखान पठाण हा कोरोची येथे राम मंगल कार्यालय या ठिकाणी आलेला असल्याची माहिती मिळाली, त्याप्रमाणे मा. पोलीस अधीक्षक साो, कोल्हापूर याचे मार्गदर्शना प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री महादेव वाघमोडे यांचे अधिपत्याखाली पोलीस उप निरीक्षक श्री विनायक सपाटे, पोहेकॉ प्रशांत कांबळे, पो.ना. सागर चौगले, पो ना.महेश खोत, पो.ना संजय इंगवले, चालक पोहेकॉ वरंडेकर यांचे पथकाने सापळा रचुन त्यास आज दिनांक २०/०६/२०२३ रोजी ताब्यात घेतले. त्यांचेकडे चौकशी केली असता, त्याना सदरचा गुन्हा केल्या पासुन जालना, अहमंदनगर, औरंगाबाद अशा ठिकाणी आपले अस्तित्व लपवुन राहीलेला आहे. तो आज रोजी कोल्हापूर येथे कोरोची ता. हातकणंगले येथील राम मंदीर कार्यालय येथील एका भाडयाची खोलीमध्ये तो एकटाच रहाणेस होता. त्यास भाडयाची खोली घेवुन देणे करीता त्याची कळंबा कारागृहामध्ये मोका गुन्हयात जेलमध्ये असताना ओळख झालेल्या मित्रांनी मदत केल्याचे प्राथमीक चौकशीमध्ये निष्पन्न झालेले आहे. आरोपीस पुढील तपास व कारवाई कामी वि.प.मार्ग पोलीस ठाणे मुंबईचे सहा पोलीस निरीक्षक, अमित भोसले व पोलीस उप निरीक्षक प्रदिप लाड यांचे पोलीस पथकाचे ताब्यात देण्यात आले आहे.

 

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक महेद्रं पडिंत यांचे मार्गदर्शना प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उप निरीक्षक विनायक सपाटे, पोहेकॉ प्रशांत कांबळे, पो.ना. सागर चौगले, पो.ना.महेश खोत, पो.ना संजय इंगवले, चालक पोहेकॉ वरंडेकर यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here