कोल्हापूर (सतीश चव्हाण) । कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि,हुपरी यांच्यावतीने हातकणंगले तालुक्यातील मजले येथे सभासद व शेतकरी वर्गासाठी हितगुज दौरा कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ऊस विषयक प्रश्नांवर शेतकरी वर्ग व सभासदांशी चर्चा करण्यात आली.
यावेळी कारखान्याचे व्हा चेअरमन बाबासो चौगुले, संचालक गौतम इंगळे, संचालक जिनगोंडा पाटील, सरपंच मधुमती पाटील, उपसरपंच बाबासो रेडेकर, ग्रामपंचायत सदस्य मिनाक्षी कुभोजे, मंगल देसाई, अरुणा कोठावळे, वैशाली पाटील, लक्ष्मी जाधव, बाळासो गायकवाड, आनंदा सनदी, दिपाली कोठावळे, बाळाबाई रोजे, शामगोंडा पाटील, अविनाश पाटील, जितेंद्र अनुसे, उप शेती अधिकारी भास्कर पट्टनकुडे यांच्यासह सभासद शेतकरी उपस्थित होते.







