इन्स्टाग्राम मित्राने भेटायला बोलावून केला मुलीवर अत्याचार

बलात्कार
file photo

अंबरनाथ (हर्षद कुलकर्णी) । एका अल्पवयीन मुलीशी इन्स्टाग्रामवर मैत्री करून नंतर तिला भेटायला बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या युवकाची मेरशे येथील सुधारगृहात रनावगी करण्यात आली आहे. संशयित युवक हा बारावीचा विद्यार्थी आहे.

 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार हा प्रकार शुक्रवार १६ ते शनिवार १७ जून दरम्यान घडला. काही महिन्यांपूर्वी संशयित युवकाची पिडीत मुलीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. कालांतराने ते एकमेकांना भेटू लागले. या भेटीचा युवकाने गैरफायदा घेतला. पीडितेला शुक्रवारी (१६ रोजी) वाढदिवसाच्या पार्टी निमीत्त एका हॉटेलवर नेले. त्यानंतर युवकाने हॉटेलातील खोलीत पीडितेवर लैंगिक अत्याचार केला.

 

घडलेला प्रकार नंतर पीडितेने आपल्या घरी सांगितला. तिच्या घरच्यांनी लगेच म्हापसातील पोलीस स्थानकावर तक्रार दाखल केली. या प्रकरणी भा. दं.सं. च्या कलम ३६३, ३७६ (३) गोवा बाल कायदा कलम ८ (२) तसेच पॉस्को कायदा ४, ६, ८, १२ कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here