टायटॅनिकचे अवशेष बघायला गेलेली पाणबुडी बेपत्ता

oceangate-submarin

कॅनडा । टायटॅनिक या जहाजाबद्दलचे आकर्षण आणि उत्सुकता आजही सर्वांना आहे. त्या काळातलं सर्वात आधुनिक आणि मोठं जहाज अटलांटिंक महासागरात बुडालं होतं. पाण्याखाली तब्बल ३८०० मीटर खोल हे जहाज आहे असे सांगितले जाते. हे जहाज बुडालं असलं तरी त्याबद्दल सगळ्यांना खूप कुतूहल आहे. त्यामुळे याचे अवशेष पाहण्यासाठी पर्टक जात असतात.

 

 

टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन गेलेली टुरिस्ट पाणबुडी अटलांटिक महासागरात बेपत्ता झाली आहे. रविवारपासून या पाणबुडीचा संपर्क तुटला आहे. फक्त ७० तास पुरेल इतकाच ऑक्सिजन पाणबुडीमध्ये शिल्लक आहे. या पाणबुडीमध्ये पायलट आणि चार पर्यटक आहेत. पाणबुडी बेपत्ता झाल्याचे समजताच अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशाकडून शोधमोहिम राबवली जात आहे.

 

 

शोधमोहिम वेगात सुरु आहे. पाणबुडीमध्ये पायलट आणि चार पर्यटक आहेत. या पर्यटकामध्ये ब्रिटनचे अब्जाधीश हामिश हार्डिंग यांचाही समावेश आहे. ५८ वर्षीय हार्डिंग एक एक्सप्लोररदेखील आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावरुन आपल्या पर्यटनाबाबतची माहिती दिली होती. अमेरिका आणि कॅनाडा यांच्याकडून सुरु असलेल्या शोधमोहित अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. दोन्ही देशाच्या रेस्क्यू टीम पाण्यात पाणबुडीचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here