इस्लामाबाद । पाकिस्तानमध्ये बस उलटून झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला तर ३२ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इस्लामाबाद-लाहोर महामार्गावर हा भीषण अपघात झाला.
या अपघातासाठी चालक आणि बस मालकाला जबाबदार धरले जात आहे. बस रावळपिंडीहून निघाल्यापासून बसमध्ये बिघाड असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी चालक व बसमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी तपास सुरू आहे.
पोलिसांनी अपघातासाठी बस चालक, बस मालक, बस कंपनीचे व्यवस्थापक यांना जबाबदार धरले आहे. रावळपिंडीहून निघाल्यावर बस व्यवस्थित चालत नव्हती. मात्र, बस सुस्थितीत असल्याचे परिवहन कंपनीने सांगितले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ट्विट करून या बस अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.







