दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा सुभेदार लवकरच सिनेमागृहात

subhedar-movie

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) । दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील सुभेदार हा पाचवा सिनेमा लवकरच सिनेप्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. याआधी ‘फर्जंद’, ‘फक्तेशिकस्त’, ‘पानवखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ या सिनेमाच्या यशानंतर सुभेदार हा पाचवा सिनेमा आहे.

 

 

नुकताच या सिनेमाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला आहे. यावेळीही शिवाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर तर जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुभेदारच्या टीझरमध्ये सध्या तरी फक्त ही दोनच पात्र दाखवण्यात आली आहे.

 

 

या आधी सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. यामध्ये अभिनेते अजय पुरकर सुभेदार सिनेमा तान्हाजी मालुसरेंची भुमिका साकारणार असल्याचं समोर आलं होतं. “आई भवानीच्या चरणी अर्पण करत आहोत श्री शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार”, असं म्हणत अजय पुरकर यांनी सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. हा सिनेमा २५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. या टीझरनंतर आता प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here