मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) । आज २१ जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिवस. आज संपूर्ण जगभरात योगा दिन साजरा केला जात आहे. सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी योगाद्वारे आपल्या शरीराची काळजी घेतात. मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फार सक्रिय असते.
सोशल मीडियावर अनेकदा ती वेगवेगळे उपक्रम राबवते. अभिनेत्रीने काल सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने योग दिनानिमित्त इंस्टाग्राम वर लाईव्ह येऊन १०८ सूर्यनमस्कार घालणार असल्याचे सांगितले. सोबतच तिने आपल्या चाहत्यांना देखील आपल्यासोबत सूर्यनमस्कार घालण्याचे आव्हान दिले.
https://www.instagram.com/prajakta_official/?hl=en
प्राजक्ताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडत आहे. तसेच ती इतर चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही व्यस्त असते. तिने स्वत:चा अस्सल मराठमोळ्या दागिन्यांचा इमिटेशन ज्वेलरी व्यवसायही सुरु केला आहे.







