कोल्हापुरात पोलिस कारवाईच्या भीतीने दोघांनी मारल्या इमारतीवरून उड्या; एकाचा मृत्यू

kolhapur-police

कोल्हापूर (सतीश जाधव) । शहराच्या राजेंद्रनगर भागातील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सहाजण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला.

 

पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारतीवरून उड्या मारल्या, त्यात साहिल मायकेल मिणेकर (राजपूत) (वय २६) याचा जागीच मृत्यू झाला तर दत्तात्रय देवकुळे गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी साहिलचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

 

राजेंद्रनगर येथील एका दुमजली इमारतीत सहाजण जुगार खेळत असल्याची माहिती रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळाली. पोलिस अकरा वाजण्याच्या सुमाराला तेथे पोहोचले असता कारवाईच्या भीतीने साहिल आणि दत्तात्रय यांनी इमारतीवरून उड्या मारल्या. इमारती खाली असलेल्या दगडावर डोके आपटल्याने साहिलचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह सीपीआरमध्ये आणण्यात आला. तर दत्तात्रय याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. साहिल हा खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here