लाच घेताना पोलिस हवालदार सापडला अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

bribe-to-police
file photo

पुणे (सुहास गायकवाड) । गुटखा व तंबाखूचा व्यवसाय करू देण्याकरिता तसेच कोणतीही कारवाई न करण्यासाठी १५ हजाराच्या लाचेची मागणी करून १२ हजार रूपयाची लाच घेणाऱ्या पोलिस हवालदारास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ जेरबंद केले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना गुटखा व तंबाखूचा व्यवसाय सुरू करू देणे कामी व तक्रारदारावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी महादेव वसंतराव शिंदे (वय ४५, पद – पोलिस हवालदार, उस्मानाबाद शहर पोलिस स्टेशन यांनी तक्रारदार यांचेकडून १५,००० रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती १२ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून पंच साक्षीदारा समक्ष स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.

 

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उप अधीक्षक सिध्दराम म्हेत्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास राठोड, पोलिस अंमलदार मधुकर जाधव, आशिष पाटील आणि विशाल डोके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here