घरातील वृध्दांना त्रास द्याल तर तीन महिन्याच्या‎ होईल कारावास

abuse-to-older

स्नेहसावली केंद्रात अॅड. ज्योती तांबट यांनी केले कायदेविषयक मार्गदर्शन‎

छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) । आपल्या देशाची ज्येष्ठांचा देश होण्याकडे‎ वाटचाल सुरू झाली आहे. ज्येष्ठांच्या समस्या,‎ त्यांच्यावरील अत्याचार समोर येऊ लागल्याने २००७ मध्ये‎ याविषयी कायदा करण्यात आला. २०२१ मध्ये त्यात‎ सुधारणाही केली गेली. यामुळे ज्येष्ठांना आधार मिळाला‎ आहे. मात्र, अजूनही त्या ज्येष्ठाभिमुख झालेल्या नाहीत.‎ ज्येष्ठांचा शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक‎ छळ केल्यास ३ महिन्यांपर्यंत कारावास होऊ शकतो, असे‎ अॅड. संगीता तांबट यांनी सांगितले.

 

स्नेहसावली केंद्र,‎ रोटरी क्लब ऑफ ईस्टच्या वतीने ‘वृद्धांचे शोषण :‎ समस्या आणि उपाय’ या विषयावर मार्गदर्शन सत्राचे‎ आयोजन केले होते. या वेळी स्नेहसावलीचे डॉ. बालाजी‎ आसेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अॅड. तांबट‎ म्हणाल्या, मागील दशकात पहिल्यांदाच देशात‎ याविषयीचा कायदा करण्याची आवश्यकता निर्माण‎ झाली. त्यामुळे २००७ मध्ये कायदा झाला. यामध्ये‎ मुलगा-मुलगी, नात आणि नातू यांना ज्येष्ठांच्या‎ छळासाठी जबाबदार धरले जात होते. २०२१ मध्ये‎ कायद्यात बदल करून जावई आणि सून यांचाही समावेश‎ त्यात केला आहे.

 

 

उतारवयात ज्येष्ठांपुढे अनेक समस्या‎ नैसर्गिकरीत्या उभ्या राहतात. आर्थिक, शारीरिक‎ अडचणींचा ते प्रत्यक्ष सामना करतात. अप्रत्यक्षरीत्या ते‎ मानसिक आजारांचाही सामना करतात. संविधानाच्या‎ कलम २१ नुसार राइट टू लाइफ याअंतर्गत त्यांना जगण्यात‎ अडचणी निर्माण करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे अशा वेळी‎ त्यांना मदत गरजेची आहे.‎ अडचण असल्यास संपर्क साधावा‎ शहरातील वकिलांचा गट ज्येष्ठांसाठी मोफत सेवा पुरवतो. ज्येष्ठांना‎ अडचण असल्यास कृपया संपर्क साधावा, असे आवाहन अॅड. तांबट‎ यांनी केले.‎

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here