कमला मिल कंपाऊंडमध्ये लिफ्ट कोसळली; १२ जखमी

lift-collapsed
Stock Image

मुंबई (दिलीप दळवी) । लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड वर्ल्ड टॉवरमध्ये चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट खाली कोसळली. आज बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

या दुर्घटनेत प्रियांका चव्हाण, प्रतीक शिंदे, अमित शिंदे, मोह. रशीद, प्रियांका पाटील, सुधीर सहारे, मयूर गोरे, तृप्ती कुबल हे जखमी झाले असून, त्यांना अशी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे.

 

किरण विश्वनाथ चौकेकर यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांचीही प्रकृती स्थिर आहे. अन्य चौघांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचार करुन त्यांनी घरी सोडण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here