रेडिओ विंग चे कार्याची मशाल सातत्याने पेटत ठेवा : रेडिओ विंग ची राज्य कार्यकारणी जाहीर

redio-wing
  • व्हॉईस ऑफ मिडिया रेडिओ विंगचे नाशिक येथील राज्य अधिवेशनात मान्यवरांचा सूर
  • रेडिओ चे विविध विषयांवर आणि ठरवांवर झाले मंथन….
  • १० लाख रुपयांचे विम्याचे देखील वितरण..
  • रेडिओ क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल ‘पत्र महर्षी’ ,’पत्र श्री’ नऊ पुरस्कार वितरण.

नाशिक (प्रतिनिधी) । येथे व्हॉईस ऑफ मिडिया रेडिओ विंग महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन चार सत्रांत घेण्यात झाले. यात रेडिओ क्षेत्रातील विविध समस्या संदर्भात विशेष मंथन होवून, अधिवेशनात १० लाख रुपयांचे चे विम्याचे तसेच राज्य कार्यकारणीतील पदाधिकारी यांस नियुक्ती पत्र आणि ओळखपत्रचे वितरण करण्यात आले. आजचा हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल , रेडिओ विंग चे कार्याची ही मशाल सातत्याने पेटत ठेवावी लागेल. असा सूर मान्यवरांनी या अधिवेशनात काढला. विशेष म्हणजे रेडिओ क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांना देखील उल्लेखनीय कार्याबद्दल ९ पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. या अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांतील रेडिओ चे संचालक आणि आर जे तसेच रेडिओ विंग चे पदाधिकारी यांचा मोठ्या प्रमाणात उत्साह यावेळी दिसून आला. विविध रेडिओ केंद्रांचे सहकारी प्रतिनिधी यांनी या अधिवेशनात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला .

 

नाशिक येथील मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर ऍडव्होकेट बापुराव गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजनिअरिंग मधील उदोजी मराठा बोर्डिंग कॅम्पस , येथे व्हॉईस ऑफ मिडिया या संघटनेच्या रेडिओ विंग चे वतीने ११ जून ला रविवारी आयोजित या एकदिवसीय अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकार विद्या विलास पाठक, व्हॉईस ऑफ मिडिया चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, विश्वास गृप नाशिक चे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर , चेतना व्यसनमुक्ती केंद्र जळगाव चे संचालक नितीन विसपुते, सामाजिक कार्यकर्ते दिलीप धात्रक नाशिक ,मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे नाशिक , व्हॉईस ऑफ मिडिया रेडिओ विंग चे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख , राष्ट्रीय कार्याध्यक्ष सचिन मेनकुदळे आणि राष्ट्रीय प्रवक्त्या रुचिता ठाकुर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इरफान सय्यद, स्वागताध्यक्ष हरिभाऊ कुलकर्णी नाशिक , हे मान्यवर तसेच सभागृहात सबंध महाराष्ट्रातील विविध रेडिओ केंद्रांचे संचालक आणि आर जे तथा व्हॉईस ऑफ मिडिया रेडिओ विंग चे पदाधिकारी आणि सदस्य यावेळी उपस्थित होते.

 

चार सत्रात हे अधिवेशन घेण्यात आले . पहिल्या सत्रात अधिवेशनाचे उद्घाटन सत्रात मंचावर मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली . त्यानंतर पुष्प गुच्छ देवून आयोजकांनी मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी प्रदेशाध्यक्ष इरफान सय्यद यांनी अधिवेशन आयोजन मागची भूमिका यावेळी स्पष्ट करत दिवसभराच्या कार्यक्रमाची माहिती यावेळी दिली.सूत्रसंचालन संदीप देशमुख यांनी तर आभार सायली जाधव यांनी मानले.
दुसऱ्या सत्रात राज्यातील रेडिओंची सद्यस्थिती आणि भविष्यकालीन वाटचालीची दिशा या विषयावरील चर्चासत्रात उदय गोडबोले, महेश जगताप , युवराज जाधव , प्रांजळ आगिवाल हे सहभागी झाले तर रुचिता ठाकूर यांनी चर्चेचे संचलन केले. तर आभार आशा मोरे यांनी मानले.

 

रेडिओ चे विविध विषयांवर आणि ठरवांवर झाले मंथन..
तिसऱ्या सत्रात ठराव यावेळी मांडण्यात आले. त्यासाठी तुमच्या उपस्थितीने अधिवेशनात ठरावांचा मसुदा मंजूर करण्यात आला यात पत्रकारिता म्हणून अधिकृत मान्यता देऊन स्टेशन इन्चार्ज वगळून पत्रकारितेत ज्या प्रकारे (संपादक, उपसंपादक )अशा प्रकारे पद समाविष्ट करावी व सरसकट आधिस्वीकृती द्यावी;स्वतःचं बातमीपत्र काढण्याची मान्यता मिळावी;सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा देण्यात यावा;शासनाकडे जे बिल पेंडिंग आहे ते परत मिळावेत;खाजगी कंपनीचे प्रोजेक्ट व राज्य शासनाच्या योजनाच्या जाहिराती देण्यात यावा;ट्रान्समिटर 500 W देण्यात यावा. असे मुद्दे यावेळी मांडण्यात आले.

रेडिओ विंग ची राज्य कार्यकारणी जाहीर.१० लाख रुपयांचे विम्याचे देखील वितरण…
चतुर्थ सत्रात व्हॉईस ऑफ मिडिया रेडिओ विंग महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली.महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इरफान सय्यद यांचेसह २२ पदाधिकारी कार्यकारणीत असून, यात २ कार्याध्यक्ष महेश जगताप पुणे आणि गायत्री म्हस्के प्रवरानगर, ३ उपाध्यक्ष हरीश कुलकर्णी नाशिक, उदय गोडबोले सांगली आणि संदीप देशमुख रिसोड , सरचिटणीस सुनील शिर्शिकर छ.संभाजी नगर, सह सरचिटणीस अनुप गुरव सातारा, कोषाध्यक्ष जयंत कापडे नंदुरबार, २ कार्यवाहक निता तूपारे पुणे आणि जगदीश भागात वर्धा, ५ संघटक समीर शिरवळकर अकोला , सविता जाधव पुणे, अनुजा मुळेय अ’ नगर आणि माधुरी ढमाळे पुणे , प्रवक्ता देवानंद इंगोले वाशिम , प्रसिद्धी प्रमुख स्वामी पाटील जळगाव , ३ सदस्य संपना डोंगरे वाशिम , विक्रम पाटील मोठे रिसोड आणि सुरेश पाटील शिंदे येवती यांचा समवेश आहे .दरम्यान नवनियुक्त पदाधिकारी आणि सदस्य यांना यावेळी नियुक्ती पत्र , ओळखपत्र, १० लाख रुपयांचे विम्याचे कार्ड देखील यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आले.

 

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात व्हॉईस ऑफ मिडिया रेडिओ विंग चे राज्याचे प्रसिध्दी प्रमुख तथा रेडिओ मनभावन जळगाव चे आर जे स्वामी पाटील, बारामती रेडिओ तून राज्य उपाध्यक्ष आशा मोरे , ठाणे रेडिओ चे श्रीपाद कुलकर्णी, कार्याध्यक्ष महेश जगताप, रेडिओ शुगर धनश्री कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून अधिवेशन नियोजन आयोजन बाबत समाधान व्यक्त केले.

 

रेडिओ क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल ९ पुरस्कारांचे वितरण.
‘पत्र महश्री’ पुरस्कार ४ : यात रेडिओ विश्वास , नाशिक – विश्वास जयदेव ठाकुर, रेडिओ मनभावन जळगाव – खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे , एम जी एम रेडिओ छ.संभाजी नगर – डॉ. रेखा शेळके आणि माणदेशी रेडिओ म्हसवद सातारा – चेतना सिन्हा. या चार मान्यवरांना ‘पत्र महश्री’ पुरस्कार देण्यात आला.
‘पत्र श्री’ पुरस्कार ५ : डॉ.चैतन्य शिंदखेडे पुणे – कम्युनिटी रेडिओ चे प्रश्नांवर प्रबंध आणि पिएचडी, दत्ता सरदेशमुख सांगली – ज्येष्ठ निवेदक, निशित कुमार मुंबई – एसबीसी ३ विविध प्रकल्पांचे माध्यमातून कम्युनिटी रेडिओला आर्थिक मदत करण्याचे कार्य , जगदीश भगत वर्धा – जेष्ठ निवेदक आकाशवाणी, आर जे रुद्र नाशिक या पाच मान्यवरांना ‘पत्र श्री’ पुरस्कार देण्यात आला.

 

एकंदरीत महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच हे अधिवेशन घेण्यात आले..रेडिओ क्षेत्रात काम करणाऱ्या सहकाऱ्यांना विमा कवच,मुलांचे शिक्षण,घर,नवे तंत्रज्ञान कौशल्य,सेवा निवृती नंतर आयुष्याचे नियोजन, अधिस्वीकृती यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.पुढे शासन आणि प्रशासन स्तरावर तत्काळ पाठपुरावा केला जाणार आहे.राज्य अधिवेशनात रेडिओ क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थित राहून आपल्या न्याय हक्का साठी एकत्रित येत चर्चा यावेळी केली.

अधिवेशन यशस्वीतेसाठी नियोजन आणि आयोजनात व्हॉईस ऑफ मिडिया चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांचे मार्गदर्शनात व्हॉईस ऑफ मिडिया रेडिओ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इरफान सय्यद आणि स्वागताध्यक्ष हरी कुलकर्णी, रेडिओ विश्वास चे सर्व सहकारी , कर्मचारी आणि व्हॉईस ऑफ मिडिया रेडिओ विंगचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले आणि सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here