ओडिशात सरकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींच घबाड

Crores-worth-of-money-found-with-a-government-official-in-Odisha

नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) । ओडिशामध्ये एका सरकारी अधिकाऱ्याकडे तपास अधिकाऱ्यांना कोट्यवधींचे घबाड सापडले आहे. यावेळी एखाद्या चित्रपटात शोभतील अशा नाट्यमय घडामोडींनंतर या अधिकाऱ्याच्या तीन घरांमधून रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि इतर संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

 

ही छापेमारी ओडिशा पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी केली. जेव्हा पोलीस प्रशासकीय अधिकारी प्रसांताकुमार रौतच्या घरी छापा टाकण्यासाठी गेले, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी दरवाजाच उघडला नाही. त्याच्या भुवनेश्वरमधील घराला पोलिसांनी घेराव घातला. काही वेळाने त्याच्या टेरेसमधून शेजाऱ्यांच्या टेरेसवर काही खोके फेकण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने शेजाऱ्यांच्या घराच्या टेरेसवर धाव घेतली. फेकलेले खोके तपासले असता त्यातून ५०० रुपयांच्या नोटांची बंडले सापडली. या ६ खोक्‍यांमधून पोलिसांना २ कोटी ३ लाखांची रोकड हाती लागली. यानंतर मात्र रौतच्या कुटुंबीयांनी दरवाजा उघडला. एकीकडे भुवनेश्वरच्या घरी छापा टाकला जात असताना दुसरीकडे नबरंगपूरमधील त्याच्या घरीही दुसऱ्या एका पथकाने छापा टाकला.

 

पोलिसांना छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड सापडली. एका पुस्तकांच्या कपाटाच्या मागे भिंतीमध्ये १० लाख ३७ हजारांची रोकड लपवून ठेवली होती. तसेच, नबरंगपूरच्या घरातून पोलिसांनी ८९ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. शेजाऱ्यांच्या घरातूनही नोटांची बंडलं ठेवलेले सहा खोके पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात २ कोटी ३ लाखांची रोकड हाती लागली. त्यामुळे एकूण ३ कोटींची रक्कम पोलिसांनी या छाप्यात ताब्यात घेतली. त्याशिवाय, सोन्याचे दागिने आणि इतर संपत्तीही पोलिसांनी ताब्यात घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here