समुद्रात बुडणाऱ्या दोन मुलांची मुंबई पोलिसांनी केली सुखरूप सुटका

mumbai-police

विरार (कैलास ठाकूर) । मुंबई पोलिसांच्या एका धाडसी हवालदाराने जीव धोक्यात घालून समुद्रात बुडणाऱ्या दोन मुलांना वाचवले. त्याच्या या कार्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर हवालदार विष्णू भाऊराव बेळे यांच्या शौर्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

 

मुंबईत मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांच्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अंधेरी सबवे येथे पाणी साचल्याने पुढील सूचना मिळेपर्यंत भुयारी मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे वाहतूक स्वामी विवेकानंद रोडकडे वळवण्यात आली आहे. अतिवृष्टीचा प्रभाव फक्त अंधेरीपुरता मर्यादित नाही. साकी नाका सिग्नल ते जरीमरीपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

व्हिडीओमध्ये सर्वत्र पाणीच पाणी असून हवालदार विष्णू भाऊराव बेले समुद्राच्या मधोमध दोन मुलांना पकडून समोर आणत असल्याचे चित्र दिसत आहे. पाण्याच्या लाटा पाहता हवालदारांनी योग्य वेळी मुलांना वाचवले नाही, तर मोठी दुर्घटना घडू शकते, असा अंदाज बांधता येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here