महावितरणचा भोंगळ कारभार : पुण्यात शॉक लागून तरुणाचा मृत्यू

dead-body
file photo

पुणे (जिल्हा प्रतिनिधी सुहास गायकवाड) । पुण्यात पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र पावसाच्या सुरुवातीलाच महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

 

लोखंडी कंपाऊंडला एका तरुणाचा हात लागल्याने त्याला शॉक बसून त्याचा जागेवर मृत्यू झाला. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली असून शनिवार असल्याने शाळा बंद होती अन्यथा पुण्यात मोठी दुर्घटना घडली असती.

 

त्यामुळे महावितरणच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अजयकुमार शर्मा असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून त्याला दोन मुले आणि पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोंढवा परिसरात अजयकुमार हा कामानिमित्त तिथून जात होता. त्याला अचानकपणे त्या ताराना धक्का लागला. त्याला जोरात शॉक बसला. यात त्याचा मृत्यू झाला.

 

मात्र याबाबत महावितरण विभाग कुठलीही जबाबदारी घेण्यास तयार नसून पोलिस देखील तक्रार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे माझ्या भावाला न्याय द्यावा अशी मागणी अजयकुमार शर्मा यांच्या भावाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here