प्रसिद्ध कॉमेडी यूट्यूबर देवराज पटेलचा अपघाती मृत्यू

devraj-patel

छत्तीसगढ । छत्तीसगडमधील प्रसिद्ध कॉमेडी यूट्यूबर देवराज पटेल याचा अपघातात मृत्यू झाला आहे. भरधाव वेगानं आलेल्या ट्रकने देवराज पटेलच्या दुचाकीला मागून धडक दिली.

 

 

यामध्ये देवराज पटेलचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रायपूरच्या तेलीबंधा पोलीस स्टेशन परिसरात घडली. देवराजचं ‘दिल से बुरा लगता है’, हे वाक्य नेटकऱ्यांनी चांगलंच डोक्यावर घेतलं होतं. देवराजच्या जाण्यानं त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

 

भरधाव असलेल्या ट्रकने देवराजच्या बाईकला मागील बाजूने धडक दिली. या धडकेत देवराजचं जागीच निधन झालं. ही घटना सोमवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. देवराजची अकाली एक्झिट ही मनाला चटका लावणारी आहे.

 

देवराजच्या निधनावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देवराजचा एक व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. यामध्ये देवराज पटेल हा छत्तीगड मध्ये दोनच लोक फेमस आहेत, एक मी आणि एक म्हणजे आमचे काका असे म्हणताना दिसत आहे. मृत्यूच्या काहीच तास आधीच देवराज पटेलने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला होता. मिळालेल्या माहितीनुसार देवराज पटेल हा रील शूट करण्यासाठी नवे रायपूर येथे आला होता. परतीच्या प्रवासाच्या वेळी हा अपघात घडला. देवराज हा अवघ्या २१ वर्षाचा होता. सध्या तो बीएच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here