पोलीस भरतीत बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल

police-bharti
FILE PHOTO

पुणे (सुहास गायकवाड) । पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दोघांवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्र तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुजित शिवाजी साळुंखे (वय-२५ रा. अकोले खुर्द, ता. माढा, जि. सोलापूर), शरद नागनाथ माने (वय-२६ रा. वडोली, ता. माढा जि. सोलापूर) यांच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत समजलेली माहिती अशी की, सुजीत साळुंखे, शरद माने पुणे ग्रामीण पोलीस दलातील भरती प्रक्रियेत सहभागी झाले होते. दोघांनी प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केले होते. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बीडमधील जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयातून घेतल्याचे दोघांनी भासवले. मात्र पडताळणीमध्ये दोघांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here