सोलापूर (प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) । शहरातील होटगी रस्त्यावरील शाही आलंमगिर ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांनी जागरुकता दाखवत ‘लव्ह पाकिस्तान’ असं लिहिलेल्या फुग्यांची विक्री करणाऱ्या एका विकृत माणसाला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
आतापर्यंत तिघांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दोन आरोपी हे ईदगाह मैदानाजवळ तर एक आरोपी हा सोलापूरच्या मुख्य बाजारपेठेत होता. त्याला तिथून ताब्यात घेण्यात आल आहे.
गुरुवारी सकाळी नमाज पठणसाठी आलेल्या मुस्लीम बांधवांचे लक्ष एका फुगेवाल्याकडे गेले. त्याच्याकडच्या फुग्यांवर आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला होता. जागरूक मुस्लीम बांधवांनी ताबडतोब या परिसरात तैनात असलेल्या पोलिसांना याविषयी माहिती दिली आणि फुगेवाल्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. अजय पवार (रा. पारधी वस्ती, विजापूर रोड, सोलापूर) असं या माणसाचं नाव आहे. अन्य दोन ठिकाणांहूनही दोन फुगे विक्रेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.







