सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल वाणी) । बार्शी येथे आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या श्री भगवंत रथ यात्रेत सामाजिक सलोख्याचे उत्कृष्ट उदाहरण माजी नगरसेविका रिजवाना ताई शेख यांच्या रुपाने दिसून आले.
या आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या श्री भगवंत रथ यात्रेत जय भगवंत ढोल-ताशा,ध्वज पथक, बार्शीच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत हातात खराटा पिशवी घेऊन उत्साहाने सहभागी झाल्या.
जात धर्माच्या पलीकडे जाऊन रिजवाना ताई कार्य करत असल्याने, त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.







