शिक्षक एस.बी.छबिले यांना राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार – २०२३ प्रदान

chatrapati-purskar

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल वाणी) । आविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंती निमित्त शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या आणि करीत असलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन सदरील पुरस्कार छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी येथील शिक्षक एस.बी.छबिले यांना डॉ. व्ही.टी.पाटील सभागृह कोल्हापूर येथे दिनांक २५ जून २०२३ रोजी प्रदान करण्यात आला.

 

या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पंकजलोचन बैश्य आसामी भाषेचे साहित्यिक गुवाहाटी आसाम, डॉ.एम.बी.शेख दक्षिण विभागीय अध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा, श्री. दिपक आर्वे सहायक पोलिस आयुक्त, श्री. सुनिल साळुंखे मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि संजय पवार पत्रकार आविष्कार फाऊंडेशन कोल्हापूरचे अध्यक्ष उपस्थित होते.सदरील पुरस्कार हा विद्यालयातील सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. व्ही. गाढवे यांचा सन्मान आहेत तसेच आपणा सर्वांच्या योगदानामुळे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असे मत पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. एस.बी.छबिले यांनी व्यक्त केले.

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्री.बी.वाय.यादव, उपाध्यक्ष श्री.नंदनजी जगदाळे,जनरल सेक्रेटरी श्री.पी.टी.पाटील, व्हाइस जनरल सेक्रेटरी श्री अरुण देबडवार, खजिनदार श्री. जयकुमारजी शितोळे, शालेय समिती चेअरमन श्री.सुरेशबप्पा पाटील, सर्व संस्था पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री.दादासाहेब चेडे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री.राहुल कवडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. एस.व्ही. गाढवे, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षक श्री एस.बी.छबिले यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here