पारोळा (डॉ.दिपक पाटील) । परिश्रम गतिमंद मुला – मुलींची निवासी शाळा,पारोळा अमळनेर रोड येथे रामदास वाकोडे पोलीस निरीक्षक पारोळा यांनी मुलांना फळे व मिठाई वाटप करून वाढदिवस साजरा केला आहे.
यापूर्वीसुध्दा वृध्दाश्रम,आदिवासी मुलांचे,मुलींचे हॉस्टेल,अनाथालय,पारधी समाजाचे पाड्यावर अशा ठिकाणी वाढदिवस साजरा केलेला आहे.
गतिमंद शाळेचे मुख्याध्यापक मनीष जाधव, उपमुख्याध्यापक हेमंत महाजन, शिक्षक जगदीश सोनवणे, शिक्षक रामकृष्ण शेलकर, किशोर शेलकर, मनोहर पाटील, निलेश महाजन, कुणाल महाजन, संजय पाटील, हे को महेंद्र मराठे, पो ना संदीप सातपुते, पो कॉ दीपक वाघ असे प्रमुख उपस्थित होते.







