तिरोडा पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांना होणारी गैरसुविधा दुर करण्यात आली

post-office

नागपूर (विभागीय संपादक मिलिंद खेकाळे) । आज दि.०३/०७/२०२३ सोमवार रोजी तिरोडा येथील पोस्ट ऑफिस कार्यालयात कर्मचारी संख्या अभावी रजीष्ट्री व स्पीड पोस्ट करण्याचे काऊंटर उघडण्यात आले नसल्यामुळे ग्राहकांना त्रास होत असल्याने दुपारी १२.३० वाजता काही ग्राहकांनी अ.भा.ग्राहक पंचायत तिरोडा शाखेकडे तक्रार केली असता ग्राहक संघटने कडून त्वरीतच तिरोडा पोस्ट ऑफिस कार्यालय गाठून पोस्टमास्तरांसोबत बोलणी करण्यात आली.

 

यावेळी त्यांनी सांगितले की, सध्या कार्यालयात कर्मचारी संख्या कमी असुन त्यातही एक कर्मचारी हे १०-१२ दिवसांच्या सुट्टी वर गेल्याने काही कामे खोळंबली असल्याचे सांगितले, त्यावर त्वरीत यांचे मुख्य कार्यालय नागपूर पोस्ट ऑफिस कार्यालयात ग्राहक पंचायत कडून फोन लावण्यात आले व त्यांना ग्राहकांना होत असलेल्या गैरसुविधा बाबद अवगत करून देण्यात आले असता त्यांनी उद्या दि.४/७/२०२३ पासून एक अतिरिक्त कर्मचारी नागपूर येथून तिरोडयाला पाठविण्याची हमी दिली आहे.

 

याबाबत तिरोडा पोस्ट ऑफिस कार्यालयाला सुचना दिल्या. रितसर तिरोडा पोस्ट ऑफिस कार्यालयाला अ.भा.ग्राहक पंचायत तिरोडा शाखे कडून रितसर तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर तिथे आलेल्या अनेक ग्राहकांनी पोस्ट ऑफिस कार्यालया पासून होणारी गैरसुविधा दुर केल्याबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here